सुपा (प्रतिनिधी)
आगामी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर सुपा व पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सुपा शहरातुन सशस्त्र संचलन केले.
सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे व पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस व पारनेर पोलीसानी संयुक्त पणे सुपा बाजारपेठतुन संचलन केले.
सुपा बाजारतळ चौकात दोन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एकत्र आले. तेथे दंगल नियंत्रक पथकाने प्रत्याक्षिक केले. यानंतर गोकावे व बळप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बाजार तळ, हायस्कुल रस्ता दत्त मंदीर रोड, नगर-पुणे महामार्ग व सुपा बस स्थानक चौक या ठिकाणी रुट मार्च काढत जनतेला शांततेचा संदेश देत, शक्ती प्रदर्शन केले.
सुप्यात औद्योगिक वसाहत व महामार्गावरील चौकातील गाव असल्यामुळे मोठी लोकवस्ती आहे. सध्या सुप्यात जवळजवळ पंधरा हजार नागरिक रहातात. यात विविध जाती, धर्माचे नागरिक, कामगार राहात असून जातीय सलोखा रहावा, आगामी सण उत्सव काळात शांतता रहावी, म्हणून तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनच्यावतीने रुट मार्च काढत नागरिकांना शांतता राखण्याचा संदेश दिला.
अचानकपणे मोठ्या संख्येने पोलिस फौज फाटा आल्याने नागरिकही घाबरत कुतुहालाने पहात होते. तर बाजारताळावरील नियम तोडून अस्तव्यस्त बसलेले भाजी विक्रेत्याची तारंबळ उडाली.