Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : पारनेर तालुक्यात 11 लाखांचा गांजासह कार जप्त

Crime News : पारनेर तालुक्यात 11 लाखांचा गांजासह कार जप्त

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील चारणवाडी येथे रविवारी (दि.17) छापा टाकत पारनेर पोलिसांनी तब्बल 42.500 किलो ग्रॅम गांजा आणि एक मारुती अल्टो कार असा एकूण 11 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना चारणवाडी (काताळवेढा) येथील रहिवासी आरोपी राहुल बाळासाहेब गुंड याने आपल्या घराच्या पाठीमागे पार्क केलेल्या अल्टो 800 कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि पारनेर पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने चारणवाडी येथे तात्काळ छापा टाकला. छाप्यात कारची झडती घेतली असता, त्यात 11 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर गांजा मिळून आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी राहुल गुंड घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला.

याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
ही कारवाई संदीप गायकवाड, कल्याण लगड, अमोल धामणे, गणेश डोंगरे, सारंग वाघ, अभिजित बोरुडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय महादेव गुट्टे, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, राहुल गुंडू व नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...