Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमपारनेर तालुक्यात चोर्‍या करणारी टोळी अटकेत

पारनेर तालुक्यात चोर्‍या करणारी टोळी अटकेत

एलसीबीची कामगिरी || साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) परिसरात शेतवस्तीवर चोरी (Theft) करणार्‍या चार सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी अटक केली. मिथुन उंबर्‍या काळे (वय 23), अक्षय उंबर्‍या काळे (वय 26), संजय ऊर्फ संज्या हातण्या भोसले (वय 55 सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व गंगाधर संदल चव्हाण (वय 21, रा. दिवटेवस्ती, वाघुंडे, ता. पारनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख 57 हजार 500 रूपये किमतीचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold Jewelry) हस्तगत केले आहे.

- Advertisement -

6 जून रोजी अंकुश भाऊ भोसले (वय 50, रा. खामकर झाप, वडगाव सायताळ, ता. पारनेर) हे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी चार इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश करून हत्याराने मारहाण व जखमी करून घरातील 69 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर व अरूण मोरे यांचे पथक सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी काम करत होते.

YouTube video player

पथक 8 जून रोजी पारनेर परिसरात फिरून गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की मिथुन उंबर्‍या काळे याने त्याच्या इतर साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन तो आता त्याच्या घरी आहे. माहिती मिळताच पथकाने लागलीच मिथुन राहत असलेल्या घरी गेले. तेथे लिंबाच्या झाडाखाली पाच ते सहा इसम बसलेले दिसले. पथकाने चौघांना पकडले. दोघे पळून गेले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. पकडलेल्या चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी पारनेर तालुक्यातील वडझिरे शिवार, भनगडवाडी व वडगाव सावताळ परिसरात चोरी केल्याची कबूली दिली. यामुळे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

नगरसह पुणे, नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी
अटक (Arrested) केलेले चौघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द विविध गुन्हे दाखल आहेत. मिथुन उंबर्‍या काळे विरोधात नगर (Nagar) व पुणे (Pune) जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल आहेत. अक्षय उंबर्‍या काळे विरोधात नगर जिल्ह्यात 13 गुन्हे दाखल आहेत. संजय हातण्या भोसले विरोधात नगर व नाशिक जिल्ह्यात 11 गुन्हे दाखल आहेत. गंगाधर संदल चव्हाण विरोधात नगर जिल्ह्यात एक गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...