Saturday, September 14, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यातील 30 गावांत पुढार्‍यांना गावबंदी

पारनेर तालुक्यातील 30 गावांत पुढार्‍यांना गावबंदी

पारनेर|तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठीबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य अशा घोषणा देत रविवारी दुपार पर्यत तालुक्यातील 30 गावांनी पुढार्‍यांना गाव बंदी केली आहे. याबाबतचे फलक प्रत्येक गावाच्या चौकात लावण्यात आले आहेत.

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील याचा उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस असुन जरांगे पाटील याची प्रकृती खालावत चालली आहे. सरकार चर्चेसाठी पुढे येताना दिसत नाही. आरक्षणावर सरकार काहीच ठोस पावले उचलताना दिसत नसल्याने गावागावातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवार पासुन मराठा समाजाने अंदोलनाची व्याप्ती वाढवली आहे. अनेक ठिकाणी मराठा तरुण, महीला व जेष्ठ नागरिकही आता सरळ सरळ पुढार्‍यांना आडवे होऊन जाब विचारताना दिसत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यत तुम्ही आमच्या गावत पाऊल ठेवायचे नाही. असे पुढार्‍यांना स्पष्ट सांगत आहेत.

जरांगे पाटलांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील मराठा समाज पहिल्या दिवसापासुन आक्रमण झालेल्या दिसत आहे. रविवारी दुपार पर्यत पारनेर तालुक्यातील 30 गावांनी पुढार्‍यांना व त्याच्या सहकार्‍यांना गाव बंद केले आहे. यामुळे या पुढार्‍यांची मोठी आडचण झाली आहे. राजकारण गेले चुलीत जो पर्यत मराठ्याना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे काळे तोंड घेऊन आमच्या गावात येवु नहे अशी गावातील नागरिकांनी आता भूमीका घेतली आहे.

आजपासून रस्त्यावर अंदोलने

संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची तब्यत अतिशय खालावत चालली असल्याने सोमवार पासुन पारनेर सकल मराठा समाज गावागावच्या रस्त्यांवर व महामार्गावर उतरून शांततेच्या मार्गाने अंदोलन करणार आसल्याची माहिती समन्वयकानी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या