Friday, May 3, 2024
Homeनाशिकअवयव दानाच्या कार्यात सहभागी व्हा : भाऊसाहेब मोरे

अवयव दानाच्या कार्यात सहभागी व्हा : भाऊसाहेब मोरे

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

अवयव दान सामाजिक कार्य आहे. प्रत्येकाने देहदान करून आपले हृदय, फुफ्फुस, किडनी, डोळे आदी अवयव दान केल्यास गरजू रुग्णांचे जीवन फुलवीने सोपे होईल. अवयव दानाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन भाऊसाहेब मोरे यांनी केले…

- Advertisement -

नाशिक येथील श्री सौराष्ट्र दशाश्री माळी जैन मंडळाने आयोजित केलेल्या वैद्यकिय व्याख्यान प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. 

यावेळी डॉ. विकास गोगटे यांनी प्रथमोपचार बदल सखोल मार्गदर्शन केले. अवयवदान व प्रथमोपचार बददल उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे  व शंकांचे भाऊसाहेब मोरे व विकास गोगटे यांनी समाधान केले अवयव दानाबदल मार्गदर्शन केल्यावर अनेकानी अवयवदान करने  व देहदानाचे फॉर्म भरून दिले.

यावेळी जैन बांधव व भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते . विश्वस्त जिग्नेश गोडा यांनी स्वागत केले तर विश्वस्त मनिष कोठरी यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या