Thursday, March 27, 2025
Homeनंदुरबारचालत्या बसमध्ये प्रवाश्याचा मृत्यू

चालत्या बसमध्ये प्रवाश्याचा मृत्यू

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

शहादा येथून धडगावकडे जाणार्‍या बसमधील 79 वर्षीय प्रवाशाचा (passenger) मृत्यू (death)झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना धडगाव तालुक्यातील खामला गावादारम्यान घडली.

- Advertisement -

39 वर्षापासून फरार तरीही तपास नाही संपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्याकन्नड घाटात आढळलेल्या महिलेच्या सांगाड्याबाबत गुढ कायमचबसच्या धडकेत दुचाकीस्वार तीन वर्‍हाड्यांचा मृत्यू

धडगाव तालुका दुर्गम भाग असल्याने बराच प्रवास घाटातून होत असतो. बस व खाजगी प्रवाशी वाहने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हुन धडगाव कडे जाणार्‍या बस (क्र. एम.एच.20,बी.एल. 3562) या गाडीत सिंगा कुत्र्या पाडवी (79 ) हे वयोवृद्ध प्रवाशी प्रवास करीत होते. त्यांची तब्येत खराब होत असल्याचे बस वाहक याना समजताच तात्काळ त्यांनी बस थेट धडगाव तालुक्यातील मांडवी प्राथमिक उपचार केंद्रावर नेत सिंगा पाडवी यांना उपचारासाठी दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली. चालत्या बसमध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सिंगा कुत्र्या पाडवी हे वयोवृध्द शहादा तालुक्यातील पिंपरापाणी येथील रहिवासी होते दरा गावं येथून ते बस मध्ये बसले होते आणि घाटात त्यांची तब्येत बिघडली होती. सिंगा पाडवी यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाल नसल्याची माहिती मिळतेय असे बस वाहक शांताराम दांडगे यांनी सांगितले.

एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आता भोगवटादार वर्ग 2 जमिनींवर तारण कर्ज मिळणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणार्‍या शेतकर्‍यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय...