Thursday, June 13, 2024
HomeनाशिकNashik Igatpuri News : अन् प्रवाशांनी रेल्वेतून घाबरून मारल्या उड्या; नेमकं काय...

Nashik Igatpuri News : अन् प्रवाशांनी रेल्वेतून घाबरून मारल्या उड्या; नेमकं काय घडलं?

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) मुंढेगाव जवळील (Mundhegao) जिंदाल कंपनीसमोर लोकमान्य टिळक टर्मिनला जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर (Gorkhapur) लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार (दि. १८) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या (Godan Express) बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाला. यावेळी गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली होती. मात्र डब्याखालून धुर निघत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र, कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर सदरची एक्सप्रेस इगतपुरीकडे रवाना करण्यात आली.

त्यानंतर ही एक्सप्रेस इगतपुरी (Igatpuri) स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगीच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित व वित्तहानी झालेली नसून सर्व प्रवासी (Passengers) सुखरूप आहेत. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांची एकच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या