Thursday, March 27, 2025
Homeनाशिकलग्नसमारंभात पेस्टल कलर्सची चलती; काय आहे हा नवा ट्रेंड?

लग्नसमारंभात पेस्टल कलर्सची चलती; काय आहे हा नवा ट्रेंड?

नाशिक | वैष्णवी नेहरकर

फॅशन म्हणताच पाहिले डोळ्यासमोर येतात ते सेलिब्रिटी व त्याचं अनुकरण करणारी तरुणाई. सध्या वेगवेगळ्या स्टाईल बाजारात मार्केटची तेजी वाढवताना दिसून येतात. अशाच एका फॅशनचा सध्या नवीन ट्रेंड आलाय. या ट्रेंडचे नाव आहे पेस्टल कलर. अनेक ठिकाणी लग्नसमारंभात नवरदेव, नवरी यांच्यात याच रंगाचे पेहराव पसंत करताना दिसून येतात.

- Advertisement -

लग्नसमारंभ म्हटलं की, सर्वात आधी विचार येतात ते म्हणजे बस्ता कसा करायचा. म्हणजेच शहरी भाषेत पेहराव कसा परिधान करावयाचा? पूर्वी नवरीचे पेहराव दागिने यांचे पूर्वी शालू असायचे. नंतर पैठणींचे क्रेज आले. त्यानंतर घागरा परिधान करताना अनेक नवरी मुलगी दिसायची.

मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पेस्टल कलरची चलती बघायला मिळत आहे. काही दिवसांपासून पेस्टल कलरचे ट्रेंड आल्यामुळे या रंगाच्या घागरांची मागणी वाढू लागली आहे.

थोडेसे मागे वळून बघितले तर नवरीचा याधीचा पेहराव हा पारंपरिक लाल, गुलाबी, हिरवा अशा रंगांचा असे. पण त्यात आता पेस्टल रंगाने भर पाडल्याचे दिसत आहे.

त्यालाच साजेसे असे दागिने आणि वरमाला यांचा ट्रेंडदेखील काहीसा बदललेला दिसतो आहे. हा ट्रेंड विदेशी जरी असला तरी भारतात याच ट्रेंडची चलती आहे.

याचे एक मुख्य कारण असेही आहे भारतामधील टॉपचे सेलिब्रिटी जसे की, वरून धवन, अनुष्का शर्मा, नेहा कक्कड याच रंगाचे पेहराव त्यांच्या लग्नामध्ये घातले होते. तेव्हापासून हा ट्रेंड रूजला असावा असे सांगितले जाते.

तरुणांमध्ये असेच पेहराव आपणही आपल्या लग्नात परिधान करण्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे हे ट्रेंड सध्या जरी चालू असले तरी हा ट्रेंड मोडून काढणारा नवीन ट्रेंड कोणता येईल हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रोमँटिक लग्नाच्या थीमला पूरक अशी नाजूक, सुसंगत रंगसंगती तयार करण्यासाठी पेस्टेल एकत्रितपणे एकत्र मिसळतात. भारतीय पारंपारिक पोशाख समकालीन शैलींच्या वाढत्या आवृत्त्यांसह जागतिक ट्रेंडच्या जवळ जाताना, चमकदार आणि लक्षवेधी रंगांच्या सोयीस्कर पारंपारीक पॅस्टलने नरम रंग आणि नि: शब्द स्वरांना मार्ग दाखविला आहे पेस्टल-रंगीत ब्राइडल लेहेंगासाठी, विशेषतः पेस्टल गुलाबीसाठी वेडिंग रेड आणि हिरव्या भाज्यांचा हजारो वधूंचा व्यापार. काही वर्षांपूर्वी वसंत रंगात वसलेले वसतिगृह, ग्रीष्म &तू आणि हंगामासाठी आता संपूर्ण हंगामातील ट्रेंड आहेत.

विशाखा निर्मलकर, एक्स्पर्ट फॅशन ब्लॉगर

रितिका देशमुख (तरुणी)

हल्ली सेलिब्रिटी मुळे pastel कलरचे ट्रेंड आले तसेच भारतातील टोपचे फॅशन डिझायनर जसे सब्या साची , मनीष मल्होत्रा हे ही pastel कलरचे घाग्रे तयार करतात आणि तरुणांमध्ये यायचे फॅशन फॉलो करण्याचे वेड असल्या कारणाने ही हा ट्रेंड प्रसिद्ध झाला आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

0
रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol राहाता (Rahata) तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Minor Girl Death) झाला...