नाशिक | Nashik
प्रादेशिक ग्रामीण, राज्य सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी सर्वोच्च पर्यवेक्षक संस्था म्हणून भारतातील नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या वतीने पतंजली रिसर्च फाउंडेशनच्या (Patanjali Research Foundation’s) सभागृहात शेतकऱ्यांसाठी (Farmer) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि शेतीला प्रोत्साहन या कार्यक्रमात देण्यात आले.
सुरुवातीला आचार्य बाळकृष्ण यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी नाबार्डचे प्रतिनिधी तज्ज्ञ उपस्थित होते. नाबार्ड ही ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी देशातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. यामध्ये पशुसंवर्धनासाठी अनेक योजना आहेत, ज्यात किसान क्रेडिट कार्ड योजना, व्याज अनुदान योजना, दीर्घकालीन कर्ज आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी इत्यादींचा समावेश आहे. या योजनांचा उद्देश भांडवली गुंतवणूक (investment) स्थिर उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हा आहे.
नाबार्ड (NABARD) भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका चालवते, तसेच कृषी प्रक्रिया सुधारते. या व्यतिरिक्त, नाबार्डने ग्रामीण भागात नवनवीन शोध, सामाजिक बदल आणि सामाजिक उपक्रमांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे बाळकृष्ण यांनी भाषणात सांगितले. पतंजलीच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, पतंजलीच्या कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे आदी गोष्टींचा समावेश आहे.