Monday, May 27, 2024
Homeनगरपाथर्डीत सुगंधी तंबाखूसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

पाथर्डीत सुगंधी तंबाखूसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेल समोर चार चाकी गाडीत सुमारे पन्नास हजार रुपयांची गुटखा बनवण्याची सुगंधी तंबाखू व पाच लाखांची चार चाकी गाडी व इतर साहित्य असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. मंगळवारी पहाटे पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

पाथर्डी शहरामध्ये सोमवारी रात्री पोलीस गस्त व कोम्बिंग ऑपरेशन करत असताना मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील एका हॉटेल समोर टोयोटा कंपनीची इटिओस गाडी (एम.एच.20 डि जे 8826 ) उभी होती पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली. गाडीत बसलेल्या लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीत तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा तयार करण्यासाठी वापरत असलेली सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी गुटखा बनवण्याच्या साहित्यासह चार चाकी गाडी जप्त केली.

संशयित आरोपी जितेंद्र नरेद्र चांडक (38, रा.नवजिवन हॉस्पिटल समोर, पैठण गेट जि.छ.संभाजीनगर), सुभाष अशोक बोर्डे (29, रा.भीमनगर, भावसिंगपुरा, छ.संभाजीनगर) शुभम रंगनाथ टकले (23, रा.महादेव मंदिराजवळ, खडकेश्वर, छ.संभाजीनगर) यांचे विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर करत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस नाईक नितीन दराडे, राम सोनवणे, निलेश म्हस्के, भगवान सानप, भगवान गरगडे, लक्ष्मण पोटे, चालक राजेंद्र सुद्रुक यांनी हि कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या