पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यात रविवारी (दि.19) घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये (Accident) एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली घटना पाथर्डी-बीड राज्य महामार्गावर (Pathardi-Beed Highway) करोडी व मोहटे गावादरम्यान मोहटे शिवारातील खाडीचे लवान येथे घडली. या अपघातात रोहित बाबासाहेब सोनटक्के (वय 22, रा. वरूर, ता. शेवगाव) या दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला. रोहित हा जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
कुत्तरवाडी येथे काम आटोपून तो दुचाकीवरून आपल्या गावी परतत असताना समोरून येणार्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, नंतर राष्ट्रीय महामार्गावरील अकोला फाटा येथे ट्रक सोडून चालक पसार झाल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कानडे व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून संबंधित ट्रक जप्त (Truck Seized) केला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला. दरम्यान, दुसरी घटना तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ते खरवंडी फाटा दरम्यान येथे घडली.
कार व दुचाकीच्या धडकेत आशाबाई शिवाजी दराडे (वय 52, रा. मालेवाडी) या गंभीर जखमी (Injured) झाल्या होत्या. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या नातेवाईकांसह दुचाकीवरून जात असताना हाय रायडर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ पाथर्डीहून अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू (Death) झाला.दोन्ही अपघातांमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कानडे तसेच सुहास बटुळे व प्रल्हाद पालवे करीत आहेत.





