Saturday, May 4, 2024
Homeनगरपाथर्डी - तिसगावमध्ये धार्मिक स्थळांची विटंबना

पाथर्डी – तिसगावमध्ये धार्मिक स्थळांची विटंबना

तिसगाव | वार्ताहर | Tisgaon

तालुक्यातील तिसगाव येथे कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गालगत बाजार तळाजवळ असलेल्या लक्ष्मीमाता मंदिरातील मूर्तींची विटंबना केल्याचा प्रकार रविवारी सकाळी काही भाविकांच्या लक्षात आला त्यानंतर तिसगाव येथील संतप्त तरुणांनी या घटनेबाबत तिव्र संताप व्यक्त मंदिराजवळच महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या धार्मिक स्थळाची शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करण्याची घटना घडली असून मूर्तीचे काही अवशेष अस्तव्यस्त फेकून देण्यात आल्याचे भाविकांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आले. याठिकाणी भाविकांनी घटस्थापना देखील केली होती. त्याची देखील विटंबना अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच तिसगाव येथील तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांनी तात्काळ तपास करावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पाथरे, सेवा संस्थेचे संचालक वाल्मीक गारुडकर, सिताराम शिंदे, रोहन शिंदे, सुनील उमाप, लखन शिंदे, भगवान शिंदे ,सुभाष शिंदे, शिवाजी जाधव, सुनील शिंदे यांनी केली आहे. या घटनेबाबत बाळासाहेब गारूडकर यांनी पाथर्डी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली असून या घटनेचा तात्काळ तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. तर दसऱ्याच्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड तिसगाव येथे आले असता माजी सैनिक पद्माकर पाथरे यांनी या घटनेचा त्वरित तपास करण्याची मागणी करतांना पोलीसांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजगी व्यक्त करताच डॉ राठोड यांनी पाथर्डी पोलीसांना चांगलेच धारेवर धरत तपासाच्या सुचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या