Friday, April 25, 2025
Homeनगरपाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेवर; आज शपथ

पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेवर; आज शपथ

पाथर्डी (प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व मुंबई युवती राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अध्यक्षा आदिती नलावडे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. यातील गर्जे हे दुलेचांदगावचे (ता. पाथर्डी, जि. नगर) रहिवासी आहेत.

गर्जे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सुरुवातीच्या काळात अकोले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आदिवासी भागात काम केले. त्यांनतर प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. लातूर येथील भूकंपाच्यावेळी त्यांनी मेहनत घेऊन आपत्कालीन परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्याने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे लक्ष वेधले गेले.

- Advertisement -

त्यांच्या अत्युत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2000 साली प्रवेश केला. पुढे 2009 साली मनसेकडून शेवगाव विधानसभा लढविली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2009 पासून आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

2014 मध्ये काही काळासाठी राज्यमंत्री दर्जा असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. प्रदेश कार्यालयात व पक्षात त्यांनी प्रशासन, निवडणूक नियोजन व पक्ष संघटना अश्या सर्व प्रकारच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांना विधान परिषदेची बक्षीसी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...