Sunday, January 25, 2026
HomeनगरPathardi : पाथर्डी पालिकेवर भाजपचाच झेंडा; नगराध्यक्षपदी अभय आव्हाड

Pathardi : पाथर्डी पालिकेवर भाजपचाच झेंडा; नगराध्यक्षपदी अभय आव्हाड

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत रविवारी मतमोजणीच्या दिवशी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 14 जागांवर दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला केवळ 5 ठिकाणी समाधान मानावे लागले, तर एक ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड हे 5840 मतांनी निवडून आले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बंडूपाटील बोरुडे यांचा पराभव केला. आव्हाड यांना 10 हजार 772 तर बोरुडे यांना 4932 मते मिळाली.

- Advertisement -

प्रभाग 5 मधील भाजप उमेदवार शीतल लोहिया यांना 840 आणि अपक्ष उमेदवार दीपाली रामनाथ बंग यांना सुद्धा 840 मते पडल्याने प्रांजल शिवते या मुलीच्या हस्ते ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली, त्यात दिपाली बंग या निवडून आल्या तर प्रभाग 9 मध्ये भाजपकडून उभ्या असलेल्या अर्चना फासे यांना 761 तर त्यांच्या विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार वंदना टेके यांना 762 मते मिळाली, आणि टेके या अवघ्या एका मताने निवडून आल्या. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी बंडू उर्फ विठ्ठल बोरुडे हे 1 हजार 119 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत भाजपकडून उभे असलेले नंदकुमार शेळके हे पालिका निवडणुकीत सलग सहाव्यांदा निवडून आले, तर भाजपच्याच मंगल कोकाटे या सुद्धा सलग पाचव्या वेळेस निवडून आल्या.

YouTube video player

नगराध्यक्षपदाचे उमेदवार, पक्ष व मिळालेली मते – अभय आव्हाड भाजप 10 हजार 772, बंडू बोरुडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 4932, नोटा 103. प्रभाग 1 अ मंगल कोकाटे भाजप 609 विजयी, शिलाबाई ढाकणे राष्ट्रवादी 353 अजित पवार, दीपाली सानप राष्ट्रवादी शरद पवार 431, नोटा 19. प्रभाग 1ब बजरंग घोडके भाजप 1034 विजयी, दत्ता पवार राष्ट्रवादी अजित पवार 125 , दत्तात्रय बोरुडे राष्ट्रवादी शरद पवार 242, नोटा 11. प्रभाग 2 अ सतीश एडके राष्ट्रवादी शरद पवार 389, आकाश काळोखे राष्ट्रवादी अजित पवार 382, धीरज बताडे अपक्ष 25, जगदीश मुने भाजप 526 विजयी, नोटा 25. प्रभाग 2ब शारदा गर्जे भाजप 476 विजयी, सोनाली तुपे राष्ट्रवादी अजित पवार 420, उज्वला पुंड राष्ट्रवादी शरद पवार 432, नोटा 19. प्रभाग 3 अ मीना चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार 110, वर्षा मोरे भाजप 1411 विजयी, स्वाती वावरे राष्ट्रवादी शरद पवार 293, नोटा 13. प्रभाग 3 ब राजेंद्र बोरुडे राष्ट्रवादी अजित पवार 161, विठ्ठल बोरुडे भाजप 1384 विजयी, सोमनाथ माने राष्ट्रवादी शरद पवार 265, नोटा 17. प्रभाग 4 अ, सुरेखा गोरे भाजप 618, मनीषा वारे राष्ट्रवादी अजित पवार 49, मंगल सोनटक्के राष्ट्रवादी शरद पवार 971 विजयी, नोटा 16. प्रभाग 4ब पांडुरंग चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार 53, ज्योती बोरुडे राष्ट्रवादी शरद पवार 744, सुभाष बोरुडे भाजप 838 विजयी, नोटा 19. प्रभाग 5 अ वर्षा धायतडक राष्ट्रवादी अजित पवार 44, आरती निर्‍हाळी राष्ट्रवादी शरद पवार 288, दीपाली बंग अपक्ष 840( विजयी चिट्ठी कौल)

शीतल लोहिया भाजप 840, नोटा 8. प्रभाग 5 ब अमोल गर्जे भाजप 1433 विजयी, योगेश रासने राष्ट्रवादी शरद पवार 548, लाला शेख राष्ट्रवादी अजित पवार 14, नोटा 25. प्रभाग 6 अ किरण खेडकर भाजप 1136 विजयी, श्रुती तरवडे राष्ट्रवादी शरद पवार 479, मनीषा मेघूडे राष्ट्रवादी अजित पवार 43, नोटा 5. प्रभाग 6 ब सुरेश कुलथे राष्ट्रवादी अजित पवार 38, युसूफ शेख राष्ट्रवादी शरद पवार 395, बाबुराव शेळके भाजप 1197 विजयी

नोटा 33. प्रभाग 7 अ नागनाथ गर्जे अपक्ष 40, शुभम दहिफळे राष्ट्रवादी अजित पवार 207, संजय देशमुख भाजप 686 विजयी, किरण पालवे राष्ट्रवादी शरद पवार 318, नोटा 12. प्रभाग 7 ब ज्योती जाधव राष्ट्रवादी अजित पवार 162, सारिका दहिफळे राष्ट्रवादी शरद पवार 418, ज्योती पवार भाजप 640 विजयी, नोटा 43. प्रभाग 8 अ मनीषा उदमले भाजप 903 विजयी, जयश्री दिवेकर राष्ट्रवादी शरद पवार 311, नोटा 49. प्रभाग 8 ब प्रतीक नांगरे भाजप 922 विजयी, आनंद सानप काँग्रेस 286, सुरेश हुलजुते राष्ट्रवादी अजित पवार 35, नोटा 20. प्रभाग 9 अ संदीप काकडे भाजप 579, शमाली पठाण अपक्ष 24, देवीदास पवार राष्ट्रवादी शरद पवार 959 विजयी, अरविंद वारे राष्ट्रवादी अजित पवार 7. नोटा 14. प्रभाग 9 ब वंदना टेके राष्ट्रवादी शरद पवार 762 विजयी, अर्चना फासे भाजप 761, अपर्णा बोरुडे राष्ट्रवादी अजित पवार 27, नोटा 33. प्रभाग 10 अ सरस्वती जेधे राष्ट्रवादी अजित पवार 107, रेखा हंडाळ राष्ट्रवादी शरद पवार 1053 विजयी, शारदा हंडाळ भाजप 609, नोटा 6. प्रभाग 10 ब भाऊसाहेब धस, राष्ट्रवादी अजित पवार 190, सविता भापकर राष्ट्रवादी शरद पवार 802 विजयी, नामदेव लबडे भाजप 770, नोटा 13.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच; वाहतुकीवर परिणाम होण्याची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून किसानसभेच्या (Kisaan Sabha) वतीने काढण्यात आलेला शेतकरी मोर्चा आज नाशिकमधून मुंबईच्या (Nashik to Mumbai)...