Sunday, October 18, 2026
Homeनगरक्रूरपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या चौघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

क्रूरपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या चौघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

शहरात जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे बाबुजी आव्हाड विद्यालय परिसरात सापळा रचून अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (एमएच २३ एयू ६०६२) अडविण्यात आला.

- Advertisement -

या टेम्पोमध्ये तीन गोवंश वासरे आणि एक बैल यांना दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह सुमारे १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. के. दहिफळे,पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासाळकर,अमोल जवरे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत तिसगावकडून पाथर्डीकडे जनावरांची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाबुजी आव्हाड विद्यालय परिसरात सापळा रचून संशयित टेम्पो अडविला.

तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये एक गावरान बैल व तीन वासरे अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती तसेच त्यांना शारीरिक वेदना होतील अशा पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी महादेव भास्कर काकडे (रा. लाकळगव्हाण, ता. गेवराई, जि. बीड), गणेश सुदरराव काजळे, आंबादास नारायण थडके (दोघे रा. सुरुडी, ता. गेवराई, जि. बीड) आणि गोरख गुलाब चव्हाण (रा. गोळेगाव तांडा, ता. गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी जनावरे सुरक्षित ताब्यात घेत वाहनासह एकूण सुमारे ₹१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...