Saturday, May 4, 2024
Homeनगरपाथर्डी, शेवगाव तालुक्यांत सरसकट नुकसान भरपाई मिळावी

पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत सरसकट नुकसान भरपाई मिळावी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgav) तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासुन सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) शेतकर्‍याचे पिके वाया गेली आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई (Farmers Compensation) मिळावी अशी मागणी आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचेकडे केली आहे.

- Advertisement -

100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही !

आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मुंबई येथे समक्ष भेट घेऊन पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील (Shevgav) शेतकर्‍यांची व्यथा मांडली. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासुन सतत पाऊस पडत असुन त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचा शेतकयांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिपावसामुळे प्रामुख्याने कापुस, तूर, बाजरी, मका, सोयाबीन आदि खरीप हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान

दोन्ही तालुक्यात अद्यापही पावसाचा जोर कायम असुन उभ्या पिकांमध्ये सध्याही सर्वत्र पाणी साचलेले आहे. शेतकर्‍याचे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले असुन जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार पाथर्डी, शेवगांव व तालुका कृषी अधिकारी पाथर्डी, शेवगाव यांनाही पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या