Monday, May 27, 2024
Homeनगरपाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने सध्या प्रचंड दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सवलती मिळाव्यात या मागणीचे निवेदन पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, यावर्षी पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. सर्वच मंडळातील खरीप पिके पावसाअभावी जळुन गेली आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व तलाव, नालाबंडिंग, बंधारे, सर्वच पाणवठे, नद्या कोरड्याठक आहेत. ऑक्टोबर मध्ये पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सुरु झाली आहे.

राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा व मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा छावण्या, शेतकर्‍यांना अनुदान, नुकसान भरपाई, पीक विमा यासह सर्वच दुष्काळी सवलती देण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, विष्णुपंत अकोलकर, अमोल गर्जे, अजय भंडारी, अजय रक्ताटे, नारायण पालवे, रवींद्र वायकर, सुनील ओव्हळ, महेश बोरुडे, सचिन पालवे, .जगदीश काळे, अ‍ॅड.चंद्रकांत सातपुते, सुधाकर डांगे, साहेबराव सातपुते, पोपट बडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाच्यावतीने पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी करत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा योगीता राजळे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला तालुकाध्यक्ष सविता भापकर, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चंद्रकांत भापकर, लक्ष्मण डांगे, दिगंबर गाडे, डॉ.रामदास बर्डे, सोमनाथ माने, राजेंद्र म्हस्के, लाला शेख, आप्पासाहेब बोरुडे, संदीप काटे, हुमायून आतार, सोमनाथ बोरुडे, बबलू वावरे, ज्योती जेधे, शबाना शेख, यमुना उर्‍हाडे, ज्योती भापकर, शुभांगी राजळे, दीपाली आंधळे, सविता दांगट, अनिता बर्डे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या