Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik News : पॅथॉलॉजीचा पेपर फुटलाच; आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून दुसरा एफआयआर

Nashik News : पॅथॉलॉजीचा पेपर फुटलाच; आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून दुसरा एफआयआर

ई-मेल करणारेही सापडेना!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आमच्याकडे गोपनीय धोरणाला फार महत्त्व आहे. कुठल्याच विद्याशाखेचे पेपर लीक (Paper leaked) होत नाहीत. केवळ पेपरफुटीच्या अफवा पसरवल्या जातात, अशी भूमिका मांडणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (University of Health Sciences) एक पेपर अखेर फुटला आहे. पूर्वीच विद्यापीठाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात पेपर लिक झाल्याचा मेल करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला असतानाच आता पेपर लिक करून शासनाची फसवणूक (Fraud) केल्याचा दुसरा गुन्हा अनोळखी व्यक्तीवर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (एमयूएचएस) घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाचा पॅथॉलॉजी-१ विषयाचा पेपर (प्रश्नपत्रिका) परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला. विद्यापीठातील परीक्षा विभागातील लिपिक किशोर दगडू जोपळे यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने सोमवारी (दि.९) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पॅथॉलॉजी-१ या विषयाचा सेक्शन बी तील दीर्घ व लघु प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका सकाळी ११.३० च्या सुमारास व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याचा मेल आला. याआधीही पेपर लिक झाल्याचा मेल आल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल आहे.

त्यानंतर सोमवारी (दि.९) पेपर लिक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पेपर लिक करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा (Case) दाखल आहे. वैद्यकीय क्षेत्राला खऱ्या अर्थाने हमी देणाऱ्या आरोग्य विद्यापीठाचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली असून एमपीएससीच्या बरोबरच वैद्यकीय विद्यापीठाचे पेपर फुटल्याने या सरकारी संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्क्रीन शॉट व्हायरल

परीक्षा सुरू होण्याआधी सुमारे एक तास आधीच प्रश्नपत्रिकांचे फोटो व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाले. सखोल तपासात युजी होस्टेल बॉईज् २०२२ या व्हॉटस्अॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचे फोटो आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ग्रुपमधील काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्याचे समजते. त्यानुसार तपास सुरू आहे.

तो पेपर सुरळीतचा दावा

बुधवारी (दि. ११) मायक्रोबायोलॉजी पेपर-१ हा पन्नास केंद्रांवर दुपारी दोन वाजता पाठवण्यात आला. बहुतांश केंद्रांवर दुपारी अडीच वाजेपर्यंत परीक्षा सुरू झाली आणि शेवटच्या अर्ध्या तासात एमसीक्यू प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. आजची परीक्षा सुरळीत पार पडल्याचे परीक्षा विभागाने सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...