पाटणा | Patana
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशभरातील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीनंतर नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी या नेत्यांना पाटणा येथील बैठकीचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज (२३ जून) पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन (Patana Opposition Parties Meeting) करण्यात आलं आहे. विरोधकांच्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO
या बैठकीला १९ विरोधी पक्षांचे नेते हजेरी लावणार आहेत. या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते पाटण्यामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे देखील पाटणामध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे गुरुवारीच पाटणामध्ये दाखल झाले होते. या बैठकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, भाकपा महासचिव डी राजा हे पाटणामध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील नुकताच पाटणा एअरपोर्टवर दाखल झाले असून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. या बैठकीसाठी गुरुवारी संध्याकाळीच एमके स्टालिन हे पाटणामध्ये दाखल झाले होते. महाराष्ट्रातून देखील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. तर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. हे सर्व नेतेमंडळी पाटणाकडे रवाना झाले आहेत.
डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, तिघांची हत्या करत स्वतः केली आत्महत्या
दरम्यान, आज सकाळी पाटण्यासाठी रवाना होण्याआधी शरद पवारांनी माध्यमांनी बैठकीत कोणता मुद्दा चर्चेत असेल याबद्दल माहिती दिली. शरद पवार म्हणाले की, देशासमोरील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. त्यानंतर देशातील काही राज्यात जसे की मणिपूर कुठल्यातरी कारणाने रस्त्यावर उतरणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केलं जात आहे. विशेषतः जेथे भाजपची सत्ता नाही त्या राज्यामध्ये हे होत आहे त्यामुळे यापाठिमागं कोण आहे हे स्पष्ट होतंय. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यासगळ्या गोष्टींवर एकत्रित विचार केला जाईल असे शरद पवार म्हणाले .
जुन्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून