Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप नेतेचे प्रपाेजल घेऊन अनेकदा आले

भाजप नेतेचे प्रपाेजल घेऊन अनेकदा आले

चीनने जमीन आज नाही, ५० वर्षांपूर्वी घेतलीराज्यातील रिमाेट कंट्राेलसंदर्भात पवार काय म्हणाले…

भारतीय जनता पक्षाबराेबर सत्ता स्थापनेसाठी आम्ही कधीच चर्चा केली नाही. भाजप नेतेच अनेकदा प्रपाेजल घेऊन आमच्याकडे आले. विराेधी पक्षाचे सरकार अस्थिर करणे हेच ‘ऑपरेशन कमळ’ आहे. ‘ऑपरेशन कमळ’चा अर्थ लाेकांनी निवडलेले सरकार दुबळी करणे, डिस्टॅब करणे त्यासाठी केंद्रातील सत्तेचा गैरवापर करणे हा आहे’ परंतु महाराष्ट्रात हे चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ चालणार नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल. शिवसेनेने भाजपसाेबत जाऊ नये, ही आपली पहिल्यपासून इच्छा हाेती. त्यामुळे आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा देऊ, असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले. शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यासाठी हे वक्तव्य हाेते, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

डिसिजन मेकिंगमध्ये फडणवीस नव्हते

२००४ मध्ये राष्ट्रवादी भाजपबराेबर सरकार बनवणार हाेते, हा विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आराेपाबाबात पवार म्हणाले, ‘२००४ मध्ये डिसिजन मेकिंग प्राेसेसमध्ये फडणवीस यांना काय स्थान हाेते? विराेधी पक्षातील जागृत आमदार म्हणून त्यांची ओळख हाेती. मुख्यमंत्री झाल्यावर लाेकांना ते माहीत झाले. राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना हाेता, असे मला वाटत नाही.’

काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची पद्धत वेगळी

शिवसेनच्या सत्ता स्थापनेपासून आदेश देणे त्याचे पालन करणे अशीच प्रथा आहे. कांँग्रेस, राष्ट्रवादीत आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करताे. पण वरिष्ठांकडून आदेश येताेच, असे नाही. जर आदेश आला तरी आम्ही त्याच्यावर चर्चा करु शकताे. शिवसेनेते एकादा नेतृत्वाने निर्णय घेतल्यावर त्या विचाराने चालायचे असते. सध्याच्या मुख्यमंत्र्यांची तिच पद्धत आहे.

ठाकरेंच्या कार्यपद्धतीत फक्त डाॅयलाॅग नाही

आघाडीचे सरकार असल्याने संवाद महत्त्वाचा आहे. यामुळे संवाद असला पाहिजे, असा आमचा आग्रह असताे. हा संवाद झाला तर समन्वय नाही, अशी चर्चा सुद्धा हाेणार नाही. ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत काही उणं दिसत नाही. फक्त डायलाॅग दिसत नाही.

फडणवीसांना सत्ताच हवी

विराेधी पक्षनेता जर आज असे म्हणत असेल की मी मुख्यमंत्री असताना माझे मुख्यमंत्रीपद गेले. त्यासंबंधीचे सत्त्य पचवायला मला वेळ लागला. म्हणजे सत्तेशिवाय मी चालू शकताे की नाही, असे ते सांगत आहे. विराेधी पक्ष नेत्याने आता स्वीकारले पाहिजे की, सत्ता आपला रस्ता नाही, अशा सल्ला पवार यांनी फडणवीसांना त्यांचे नाव न घेता दिला. सत्ता येते आणि जाते पण लाेकांनी दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढवू.

- Advertisment -

ताज्या बातम्या