Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशPaytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना जामीन मंजूर, पोलिसांनी का केली...

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना जामीन मंजूर, पोलिसांनी का केली होती अटक?

दिल्ली | Delhi

पेटीएमचे (Paytm) संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांना गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

- Advertisement -

विजय शेखर शर्मा हे जगुआर लँड रोव्हर कारने जात होते. यावेळी दिल्लीतील (Delhi) मदर इंटरनॅशनल शाळेसमोर त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कारलाच जोराची धडक दिली होती. या प्रकरणात त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त बेनिता मॅरी जॅकर यांच्या कारला फेब्रुवारी महिन्यामध्ये एका लक्झरी कारने टक्कर दिली होती. ही कर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा चालवत असल्याचा आरोप आाहे.

या घटनेसंदर्भात डीसीपींच्या ड्रायव्हर कॉन्स्टेबलने केस दाखल केली होती. त्यानंतर शर्मा यांना IPC कलम 279 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत अटक करण्यात आली. त्यावेळी डीसीपींचे ड्रायव्हर असलेले कॉन्स्टेबल दीपक कुमार यांनी एफआयआर दाखल केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या