Tuesday, November 10, 2026
HomeनगरAhilyanagar : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजरी, सोयाबीन, मूग आणि उडदाची भरपाई

Ahilyanagar : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजरी, सोयाबीन, मूग आणि उडदाची भरपाई

खरीप हंगामात 2 लाख 80 हजार शेतकर्‍यांनी घेतले 1 हजार 458 कोटींचे विमा कवच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा सुरूवातीपासून पावसाची स्थिती अनिश्चित असल्याने जिल्ह्यात चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 391 शेतकर्‍यांनी 4 लाख 77 अर्जाव्दारे विविध पिकांचा विमा उतरवलेला आहे. दरम्यान, खरीप हंगामाचा सांगता झालेली असून कृषी विभागाकडून अनेक पिकांची पिक कापणी पूर्ण करण्यात आलेली आहे. या पिक कापणीनुसार यंदा जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी, मूग आणि उडीद पिकाचा विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरपाईची शक्यता आहे.

- Advertisement -

2025 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 2 लाख 24 हजार 145 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवून 4 लाख 51 हजार 149 अर्ज केले होते. त्यातून 2 लाख 38 हजार 872 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते आणि 1 हजार 236.17 कोटी रूपयांची विमा भरपाई शेतकर्‍यांना मिळाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (2026 च्या खरीप हंगामात) शेतकर्‍यांच्या संख्येत 35 हजार 147 ने वाढ झाली असून, एकूण 2 लाख 59 हजार 292 शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या नुकसानीच्या वेळी शेतकर्‍यांना 1 हजार 458 कोटींचे सुरक्षा छत्र उपलब्ध होणार असून, यामध्ये 2 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पारनेर, जामखेड आणि अहिल्यानगर या तालुक्यांमध्ये शेतकरी संख्या आणि विम्याचे संरक्षण मूल्य यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने या विम्याचा शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांवरील विम्याच्या हप्त्याचा आर्थिक भार कमी झाला असून, कमी खर्चात 1 हजार 458कोटींपेक्षा जास्त रकमेची जोखीम विमा कंपनीकडे वर्ग झाली आहे.

दरम्यान, यंदा पिक विमा योजनेतील भरपाईसाठी पिक कपाणी प्रयोग महत्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात कमी पावसामुळे अथवा एकदा पाऊस झाल्यानंतर तो गायब झाल्याने शेतकर्‍यांनी केलेल्या पिकांचे उत्पादन 50 ते 99 टक्क्यापर्यंत घटलेले आहे. कृषी विभागाच्या पिक कापाणी प्रयोगात हे सिध्द झाले असून त्यामुळे यंदा खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांना पिक विमा रक्कमेची भरपाई मिळणार आहे. कृषी विभागाच्या सुत्रांच्या माहितीनूसार जिल्ह्यात उडीद आणि मूग पिकाची पिक कापणी पूर्ण झालेली असून सोयाबीन आणि बाजरी पिकांची अंतिम टप्प्यात आहे. यामुळे डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात जिल्ह्यातील उडीद आणि मूगसह सोयाबीन आणि कपाशी पिकाचा पिक विमा मंजूर होणार आहे.

सोयाबीनलाच 880 कोटींचे संरक्षण
यंदा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने पीक विमा घेतला आहे. सोयाबीनसाठी 2 लाख 33 हजार 637 अर्ज दाखल झाले असून, 880 कोटींचे विमा संरक्षण कवच मिळाले आहे. त्यापाठोपाठ कापूस उत्पादकांनी 65 हजार 733 अर्जांद्वारे 232 कोटींचे, तर तूर उत्पादकांनी 51 हजार 817 अर्जांद्वारे 124 कोटींचे विमा संरक्षण मिळवले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : नगरमध्ये फटाके फेकण्यावरून दोन गटांत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सुतळी बॉम्ब पेटवून एकमेकांच्या दिशेने फेकण्याच्या प्रकारातून फुलसौंदर चौकात दोन गटांत जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री...