Monday, December 2, 2024
HomeनाशिकAccident : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Accident : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

चांदवड । प्रतिनिधी Chandwad

मुंबई-आग्रा महामार्गावर वडाळीभोई शिवारात भरधाव कारच्या धडकेने 38 वर्षीय पादचारी ठार झाला. चांदवड कडून नाशिककडे भरधाव जाणार्‍या कार क्र. एम एच 12 एन एस 1396 वडाळीभोई शिवारातील यश पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणार्‍या संजय रामबाबू सिंह (38, रा. कोठरा जिल्हा कासगज उत्तर प्रदेश)यांना जोरदार धडक दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा Political News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार

कार च्या जोरदार धडकेत संजय रामबाबू सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गोपाल बाबू सिंह यांनी वडनेर भैरव पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी कारचालक संजय गवळी रा. धुळे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या