Saturday, May 18, 2024
Homeनगरग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषद समोर निदर्शने

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषद समोर निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या (Pending demands of Gram Panchayat employees) पूर्ण होत नसल्याने मंगळवारी (10 ऑगस्ट) निषेध दिवस पाळून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (Pending demands of Gram Panchayat employees) वतीने जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

बुरुडगाव रोड (Burudgaon Road) येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाने येऊन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात (Movement) संघटनेचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, एकनाथ सकट, राहुल चव्हाण, सतीश पवार, शब्बीर शेख, उत्तम कटारे, बाळासाहेब लोखंडे, कृष्णा थोरात, सुरेश पानसरे, बजरंग मुरमुडे, धोंडीभाऊ सातपुते, सचिन कुलट, रंगनाथ चांदणे, भाऊ जगधने आदी ग्रामपंचायत कर्मचारी (Grampanchayat staff) सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण होत नसल्याने सर्व कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या वतीने संपुर्ण जिल्ह्यात निषेध दिवस पाळण्यात आला. प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती समोर निषेध दिनानिमित्त निदर्शने करुन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी निवेदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या