पेन्शन धारकांच्या समस्यांंसाठी ‘या’ दिवशी पेन्शन अदालत

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेंशन धारकांच्या (Pensioners) पेंशन (Pension) संबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठ पेंशन अदालतीचे आयोजन (Organization of Pension Court) करण्यात आले आहे.

आपल्या तक्रारी सोडवून घेण्यासाठी सर्व पेंशनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम (Regional Provident Fund Commissioner Anil Kumar Pritam) यांनी केले आहे.

भविष्य निधी पेंशन अदालत सर्व भविष्य निधी पेंशन धारकांच्या (ईपीएस 1995) पेंशन संबंधी काही तक्रारी (Complaints), समस्या (problems) असतील त्यांच्या समस्या चे निराकरण करण्यासाठी भविष्य निधी कार्यालय, नाशिक (nashik) येथे गुरुवारी (दि.10) सका.11 ते 1 या वेळेत पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

ज्या पेंशन धारकांच्या (Pensioners) पेंशन संबंधी काही तक्रारी असतील त्यांनी आपापल्या सर्व आवश्यक कागदपत्रासह भविष्य निधी कार्यालय, भविष्य निधी भवन, आयटीआय पूल, सातपूर येथे उपस्थित रहावे, त्यांच्या सर्व तक्रारी व समस्याचे निराकरण करण्यात येईल. असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्री अनिल कुमार प्रीतम यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *