Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनप्यार से लोग मुझे कहते हैं... ‘कुली नं 1’

प्यार से लोग मुझे कहते हैं… ‘कुली नं 1’

मुंबई – Mumbai

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर ‘कुली नं 1’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

- Advertisement -

चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटामध्ये अभिनेते परेश रावल यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एक असे वडील जे आपल्या मुलीचं लग्न एका मोठ्या आणि श्रीमंत घरातील मुलासोबत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात.

ट्रेलरमधील रावल यांची भूमिका अत्यंत विनोदी असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे साराचा ग्लॅमरस अंदाज आणि वरूणचा कॉमिक टाइमिंग कमालच वाटत आहे. शिवाय सारा आणि वरूणमधील रोमाँटिक केमिस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक डेविड धवन यांनी केले असून त्यांचा हा 45वा चित्रपट आहे. ’कुली नं 1’ हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...