Tuesday, March 25, 2025
Homeजळगावपक्ष फोडाफोडीचा प्रयोग जनतेला पटलेला नाही-खा.डॉ.हुसेन

पक्ष फोडाफोडीचा प्रयोग जनतेला पटलेला नाही-खा.डॉ.हुसेन

रावेर । प्रतिनिधी

धनंजय चौधरींच्या प्रचारार्थ रावेरला जाहीर सभा

- Advertisement -

महायुतीचे पदाधिकारी सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यासाठी त्यांनी पक्षांची फोडाफोडी करीत सत्ता मिळवली. मात्र राज्यातील सामान्य जनतेला हा प्रयोग पटलेला नाही. गद्दारी करीत मिळवलेल्या महायुतीच्या सत्ताधार्‍यांना जनता आता या निवडणुकीत योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी टिका खासदार डॉ नासीर हुसेन यांनी केली. रावेर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे रावेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ रावेर येथील शौकत मैदानावर मंगळवारी रात्री जाहीर सभेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, अली अंजुम रिझवी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, गोटूशेठ महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सुनील कोंडे, अब्दुल समद, अब्दुल मुतल्लीब, युसुफ खान, गयास शेख, गयास काझी, अब्दुल रफिक, सादिक शेख, महेमूद शेख, गोंडू महाजन, जावेद जनाब, इस्माईल पहेलवान, रशीद खाटिक, इम्रान शेख, योगेश गजरे, विनायक महाजन, अय्युब मेंबर, असदुल्ला खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अली अंजुम रिझवी, अब्दुल मुतल्लीब यांनी सभेला संबोधित केले.

सत्तेसाठी फुट पाडण्याचा प्रयत्न-अली अंजुम रिझवी
सत्तेसाठी विशिष्ट समाजातील लोकांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्तीकडून सुरु आहे. रावेर मतदार संघात मुस्लीम समाजाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही. मात्र या समाजातील व्यक्तीचा वापर करून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा हा महायुतीचा डाव आहे. मुस्लीम समाजाने काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अली अंजुम रिझवी यांनी यावेळी समाज बांधवाना केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...