पिंपळनेर – dhule
शहरातील हरीओम नगर व सामोडे येथील ५ बंद घरफोडी दाखल गुन्ह्याचा तपास एपीआय सचिन साळुंके व त्यांच्या पथकाने काही दिवसात उघडकीस आणून ४ आरोपींना ताब्यात घेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे यात ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत त्यांना बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.
शहरातील हरीओम नगर येथील दिलीप आंनदा महाजन यांचे राहते घरी बंद घराचे कुलुप तोडुन घरफोडी चोरी केल्याने पिंपळनेर पोलीस स्टेशनात भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सामोडे गावात दि.९ जानेवारी रोजीचे रात्री ९ ते दि.१० जानेवारी रोजीचे सकाळी ७ वाजेच्या दरम्यान एकाच रात्रीत ५ ठिकाणी वेगवेगळया बंद घरात चोरीचा प्रकार घडला होता त्याबाबत पिपळनेर पोलीस स्टेशन येथे दि.१३ रोजी तक्रारदार किरण विलास घरटे वय २८ धंदा शेती रा सामोडे यांनी तक्रार दिल्याने भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर मालमत्ते संदर्भात दाखल गुन्हयाची गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय बारकुड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी सदर गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे आदेशाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हददीत सदर गुन्हे उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमण्यात आले होते.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पोसई. बी.एम मालचे, असई. बी. आर पिंपळे, पोहेकॉ. कांतिलाल अहिरे, पोना. प्रकाश मालचे, पोकॉ. हेमंत पाटोळे, पोकॉ. राकेश बोरसे, चालक पोकॉ. रविंद्र सुर्यवंशी, चालक पोकॉ.पकज वाघ, पोकॉ. विजयकुमार पाटील, पोकॉ. सोमनाथ पाटील, चालक पोकॉ. नरेंद्र परदेशी यांनी केली आहे.