Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्र‘वंचित’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

‘वंचित’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई | वृत्तसंस्था

मुंबईमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलनाची घोषणा केली. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे पाच ते सात हजार आंदोलक याठिकाणी येणार असल्याचा अंदाज असल्यामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे.

- Advertisement -

परवानगी नाकारली असली तरी प्रकाश आंबेडकर आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन कशाप्रकारे होणार, आंदोलन झालं तर पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात हे धरणं आंदोलन असून दादर टीटी, ऑगस्ट क्रांती मैदान आणि धारावी अशा ठिकाणी हे धरणं आंदोलन होणार आहे.

या आंदोलनामुळे मुंबईत दादर टीटीसह अनेक मार्गांची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. दादरमधील टिळक ब्रिज सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तर ठाणे, पुण्याहून येणाऱ्या जड वाहनांना शिवडी, वडाळा मार्गे दक्षिण मुंबईकडे जाता येईल असे सांगण्यात आले आहे.

तसेच दादरहून उड्डाण पूलमार्गे परळ, एलफिन्स्टनहून वरळीकडे जाता येईल. तर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

0
रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol राहाता (Rahata) तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Minor Girl Death) झाला...