नवी दिल्ली | New Delhi
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किंमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती. पंरतु, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याने देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत….
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
त्यानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १९ पैशांची वाढ (Growth) झाली आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर शेजारील गुजरात राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६५ पैशांची घसरण झाली आहे.
Train Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी
दुसरीकडे छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे पेट्रोल ६० व ४७ तर डिझेल ५९ व ४३ पैशांनी महागले आहे. तसेच उत्तरप्रदेशात पेट्रोल-डिझेल २५ पैशांनी महागले असून पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये इंधन महागले आहे. तसेच हरियाणा आणि मध्यप्रदेशात अनुक्रमे पेट्रोल २८ व ३० पैशांनी स्वस्त झाले आहे. तर मध्यप्रदेशात डिझेल २८ पैशांनी स्वस्त झाले आहे.