Monday, April 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिला झटका, अधिसूचनाही काढली

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिला झटका, अधिसूचनाही काढली

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

केंद्र सरकारने आज (सोमवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel ) उत्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत महसूल विभागाकडून अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

या अधिसूचनेत म्हटले आहे की, “केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.

तसेच या अधिसूचनेत उत्पादन शुल्कात वाढ केल्याने किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे सांगण्यात आलेले नाही. परंतु,किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे उद्योग क्षेत्रातील काहींचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या (international oil) किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ वॉरमुळे आज (दि.०७) रोजी सकाळी शेअर बाजारात तीन हजार अंकांपेक्षा जास्त घसरण बघायला मिळाली. यामुळे करोडो गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा फटका सहन होत नाही तोवरच आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे भारतीयांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Tanisha Bhise Death Case : मोठी बातमी! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ....

0
पुणे । Pune दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या...