Wednesday, May 22, 2024
Homeदेश विदेशPetrol-Disel Price : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती 'जैसे थे'!

Petrol-Disel Price : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती ‘जैसे थे’!

दिल्ली | Delhi

देशात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2021) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजही वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol disel rate today) किमतींमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सलग २९ व्य दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर आहेत.

- Advertisement -

आज (रविवार) मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.

दरम्यान शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने (Tamilnadu govt) पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. तमिळनाडू सरकारने उचललेल्या या पावलानंतर दुसऱ्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर लागणारा टॅक्स कमी होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती ९ वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये ५ वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये १६-१६ वेळा वाढ झाली होती. ४ मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ११.४४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ९.१४ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

दरम्यान जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढल्याने मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे देशभरातील अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या