Monday, May 4, 2026
HomeनगरAhilyanagar : पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा फिटनेसचा प्रश्न गंभीर

Ahilyanagar : पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा फिटनेसचा प्रश्न गंभीर

चालू आठवड्यात 50 ते 60 टँकर ठप्प होण्याची चिन्हे, पेट्रोल चालकांची आरटीओकडे धावाधाव

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आधीच अमेरिका- इस्त्राईल आणि इराण युध्दामुळे विस्कळीत झालेला इंधनाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 450 ते 500 पैकी जवळपास निम्म्या पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा फिटनेस प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत नगर आणि श्रीरामपूर आरटीओकडे फिटनेस संपलेल्या पेट्रोल आणि डिझेल वाहतूक करणे टँकर आणि पेट्रोलपंप चालकांनी धावाधाव करत संबंधित टँकरची तपासणी करून त्यांना नव्याने फिटनेस देण्याची मागणी केली आहे. मात्र, परिवहन खात्याकडील आणि आरटीओ यांना इंधन टँकरची वाहतूक करणार्‍या टँकरच्या फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे अधिकार गोठवण्यात आले आहेत. यामुळे चालू आठवड्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 50 ते 60 डिझेल टँकर बंद होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा इंधन टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण होणार आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात सध्या 450 ते 500 टँकरव्दारे इंधन डेपो (उत्तरेचा मनमाड, तर दक्षिणेचा अकोळनेर, ता. नगर) येथून पेट्रोल पंपापर्यंत पुरवठा करण्यात येतो. यातील बहुतांशी इंधन वाहतूक करणार्‍या टँकर यांचे दरवर्षी परिवहन विभाग (आरटीओ) यांच्याकडून फिटनेस करून घेण्यात येते. संबंधित टँकरला फिटनेस प्रमाणपत्र असेल तरच त्यांना पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करता येते. मात्र, जिल्ह्यातील 150 ते 200 टँकरच्या फिटनेसचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. या टँकरांना आरटीओने फिटनेस प्रमाण न दिल्यास त्यांना इंधनाची वाहतूक करता येणार नाही. इंधनाची वाहतूक न झाल्यास संबंधित पेट्रोलपंपला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करता येणार नाही. परिणामी जिल्ह्यात पुन्हा कृत्रिम इंधन टंचाईचे सावट आहे.

दरम्यान, उत्तर नगर जिल्ह्यात पेट्रोलपंप चालकांनी दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरच्या आरटीओ कार्यालयात धाव घेत हा प्रश्न मांडला. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या टँकर यांना देण्यात येणार्‍या फिटनेस प्रमाणपत्राचे उपप्रादेशिक अधिकारी (आरटीओ) यांचे अधिकार गोठवले आहेत. यामुळे आरटीओ कार्यलय देखील हतबल आहे. याबाबत आता सरकार पातळीवरून तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. तसे न झाल्यास जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझलेच्या वाहतुकीवर परिणाम होवून त्याचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.

यापूर्वी दिली होती तात्पूर्ती मुदतवाढ
जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या टँकर यांना उपप्रादेशिक अधिकारी यांच्या पातळीवर तात्पुरते फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, आता त्याबाबत परिवहन खात्याकडे असणारे अधिकार आता केंद्र सरकारकडून गोठवण्यात आले आहेत. यामुळे जोपर्यंत केंद्राकडून हे अधिकार राज्याला मिळत नाहीत, तोपर्यंत राज्याचे परिवहन विभाग देखील काहीच करून शकत नाही, अशी माहिती पेट्रोल पंप संघटनेला देण्यात आली आहे.

केवळ नाशिक व औरंगाबादला केंद्र सुरू
राज्यात सध्या नाशिक व औरंगाबाद या ठिकाणी अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या टँकर यांना फिटनेस देणारे केंद्र सुरु आहेत. जिल्हा पातळीवरील केंद्र बंद आहेत. नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी प्रत्येक टँकरची तपासणी होवून त्यांना फिटनेस देण्यात वेळ जाणार आहे. यामुळे आता जिल्हा पातळीवर असणार्‍या आरटीओ अधिकारी यांना हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Tamil Nadu Assembly Election 2026 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन...

0
नवी दिल्ली | New Delhi देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांचा निकाल (Result) जाहीर होत आहे. या पाचही ठिकाणचे चित्र...