Friday, April 25, 2025
Homeनगरपेट्रोलपंपाशेजारी पेटला वनवा; महिला कर्मचार्‍यांची एकच तारांबळ

पेट्रोलपंपाशेजारी पेटला वनवा; महिला कर्मचार्‍यांची एकच तारांबळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर-मनमाड रोडवर बोल्हेगाव फाटा परिसरात असणार्‍या पेट्रोल पंपा शेजारील मोकळ्या जागेत रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक वनवा पेटला. यावेळी या भागात असणार्‍या वाळलेल्या गवतासोबत हिरव्या झुडुपाने देखील पेट घेतला. आधी वार्‍याची दिशा बदल्याने हा वनवा काही मिनिटांत पेट्रोल पंपाच्या बाजूने सरकल्याचे दिसताच, पेट्रोल पंपावर असणार्‍या महिला कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली. यावेळी काही तरुण या महिला कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून आले. तसेच पंपावर असलेल्या पाण्याच्या कनेक्शनमधून पंपा शेजारी असणार्‍या झुडुपांवर पाणी शिंपडण्यात आले. दरम्यान, वार्‍याची दिशा बदलल्याने हा वनवा विरुद्ध दिशेला सरकला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

रविवारी दुपारी चारच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाटा याठिकाणी असणार्‍या महिला नियंत्रित पेट्रोल पंपा शेजारी असणार्‍या मोकळ्या जागेतील गवताने अचानक पेट घेतला. यावेळी परिसरात असणार्‍या सुकलेल्या गवातासोबत वाढलेली हिरवी झुडुपे आणि वेड्या बाभळींनी देखील पेट घेतला. सुरुवातीच्या काही क्षणात असणारा हा वनवा अचानक वार्‍याने दिशा बदलल्याने पेट्रोल पंपाच्या दिशेने धगधगू लागला. ही बाब पेट्रोल पंपावर कामावर असणार्‍या पाच ते सहा महिला कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पेट्रोल पंपावर असणार्‍या दोन ते तीन नळ कनेक्शनला पाईप जोडून, पेट्रोल पंपा शेजारी असणार्‍या हिरव्या झुडपावर पाण्याचा मारा सुरू केला. यावेळी काही महिलांनी बादलीच्या साह्याने पेट्रोल पंपाकडील गवतावर आणि झुडुपावर पाणी टाकत ती ओली करून पेट्रोल पंपाकडे सरकणार्‍या वनव्याला रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंप परिसरात असणार्‍या दुकानातील काही तरुण या महिलांच्या मदतीला धावून आले. हा वनवा पेट्रोल पंपाच्या दिशेने सरकतो की काय अशी भीती सर्वांच्या मनात असताना अचानक वार्‍याने दिशा बदलली आणि पेटलेला हा वनवा विरुद्ध दिशेने सरकला.

तसेच पेट्रोल पंपाकडील बाजू असणार्‍या भागात महिलांनी पाण्याचा मारा करत आग या बाजूने सरकू दिली नाही. यामुळे या भागातील मोठी दुर्घटना टाळली. हा वनवा पेट्रोल पंपाच्या दिशेने सरकला असता, तर त्याचा मोठा फटका पेट्रोल पंपाला बसण्याची शक्यता होती. कारण पंपाच्या काही फुटावर आगीच्या ज्वाला धगधगत होत्या. सुदैवाने या ठिकाणी पेटलेला वनवा आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...