Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशफायझरकडून तातडीच्या लसीसाठी भारतात अर्ज

फायझरकडून तातडीच्या लसीसाठी भारतात अर्ज

नवी दिल्ली

फाइझर या औषध निर्माण कंपनीने कोविड-१९ च्या लसीच्या आपत्‍कालीन वापरासाठी मंजुरीसाठी भारतीय औषध महानियंत्रककडे अर्ज केला आहे. फायझरच्या लसीला ब्रिटेनमध्ये मंजुरी मिळाली आहे. भारतात तातडीच्या परवानगीसाठी (emergency use)आलेला हा पहिलाच अर्ज आहे.

- Advertisement -

भारतीय औषध महानियंत्रक यांना केलेल्‍या विनंती अर्जामध्ये कंपनीने देशात लसीच्या आयात आणि वितरणासाठी मंजूरी देण्याची विनंती केली आहे. त्या सोबतच औषध आणि चिकित्सालयीन चाचणी नियम,२०१९ च्या विशेष तरतुदी अंतर्गत भारताच्या लोकसंख्येवर वैद्यकीय चाचण्या करण्यासाठीची देखील विनंती करण्यात आली आहे.

फायझर इंडियाने भारतामध्ये कोविड-१९ लसीच्या आपत्‍कालीन मंजूरीसाठी ४ डिसेंबर रोजी डीजीसीआयकडे अर्ज केला आहे. ब्रिटेनने (बुधवार) फायझर कोविड-१९ लसीच्या आपत्‍कालीन वापरासाठी तात्‍पूरती मंजूरी दिली होती. ब्रिटननंतर बहरीन जगातला दुसरा देश बनला ज्‍याने औषध निर्माण कंपनी फायझर आणि त्‍यांच्या जर्मन सहकारी बायोटेक विकसित कोविड-१९ लसीच्या आपत्‍कालीन वापरासाठी औपचारिक मंजूरी दिली आहे. या कंपनीकडून अमेरिकेतही अशा प्रकारच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...