Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधशिमगोत्सव

शिमगोत्सव

वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

- Advertisement -

ज्या लोककलेकडे मुलांना घेऊन संजय येत होता तोच मुलांना आवाज ऐकू आला हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा…. होय महाराजा….

आज जो शिमग्याचा सण सगळे पोरा-टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतात त्यांचे तू नेहमी सांभाळ कर

आणि जी काय ईडा, पिडा वाकडा, नाकडा असात त दूर कर रे महाराजा ….

होय महाराजा ….

असे गार्‍हाणे घालून, कोकणामध्ये जो सण साजरा केला जातो तो म्हणजे शिमगोत्सव. होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले फक्त उत्सवच नसून खर्‍या अर्थाने कोकणातील पारंपरिक लोककला आहेत. यांचा संबंध शेतकर्‍यांशी येतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी/ मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात.

फाल्गुन महिना हा एक भारतीय हिंदू पंचांगानुसार वर्षातील बारावा महिना आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचवी तिथी म्हणजेच फाल्गुन शुक्ल पंचमी. या महिन्यात

होळी पौर्णिमा (हुताशनी पौर्णिमा) हा सण येतो. शिमगा हा एक लोकोत्सव आहे. होरी (उत्तर भारत), होळी, शिमगा (महाराष्ट्र), शिग्मा, शिग्मो (कोकण, गोमंतक) या नावांनी प्रसिद्ध आहे. देशी नाममालेत हेमचंद्राने या लोकत्सवाला सुगिम्हअ (सुग्रीष्मक) असे म्हटले आहे. सुगिम्हअवरून शिग्मा हा शब्द आला आणि वर्णविपर्याने त्याला शिमगा हे नाव पडले. महाराष्ट्रात रूढ असलेल्या या शिमगा उत्सवाला हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, कामंदहन अशी नावे आहेत. फाल्गुनी पौणिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव करावा, असे म्हटले जाते. या उत्सवाचे अजून महत्त्व म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करणे.

बाहेरगावी असलेले चाकरमानीही शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरतात आणि सगळीकडे एक वेगळे जल्लोषाचे वातावरण असते. पालख्या नाचतात, होळी आणतात. गावागावांतल्या या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या प्रकारे असतात आणि त्या तशा तिथे राबवल्या जातात. तोच आनंद घेण्यासाठी सर्वजण गावाकडे धाव घेत असतात. दोन गावच्या पालख्यांची भेट म्हणजे बहीण-भावांची भेट असते आणि ही भेट हादेखील या शिमगा उत्सवातील एक अनोखा सोहळा असतो. गावागावांतल्या एकोप्याचे प्रतीक असलेला हा सोहळा अवर्णनीय असतो.

कोकणातला शिमगा उत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणत: गुढीपाडव्यापर्यंत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा अधिक आहे.

फाल्गन शुक्ल पंचमी ते हुताशनी पौर्णिमा या दिवसांमध्ये कोकणातील लहान-मोठ्या गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी काढण्याची प्रथा असते. या पालखीमध्ये ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावागावांतील प्रत्येक वाडीमध्ये घरासमोरून पालखी नाचवली जाते. त्याचवेळी गावाची देवकार्याची जागा पण निवडली जाते. या ठिकाणी केवळ पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो. या पालखी नाचण्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक चाकरमानी पुणे, मुंबईतून कोकणात आपल्या गावी येतात. आठ दिवसांची सुट्टी काढून वेळप्रसंगी एसटीमधून धक्के खात मुंबईचा चाकरमानी आवर्जून गावाकडे येतो. तो ज्या उत्सवासाठी येतो तो उत्सव म्हणजे शिमगा.

आधीच उल्हास त्यात, फाल्गुन मास

या म्हणीचे पुढीलप्रमाणे किंवा अन्वयार्थ लागतात असे आपण म्हणू शकतो, हे मुलांना संजय सांगत होता. एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला ती गोष्ट न करण्यासाठी नेमका बहाना सापडतो. आता आले का लक्षात? मुले हो ची मान डोलवत पुढचे ऐकण्यास उत्सुक होते.

कृष्णाचा वध करायला आलेल्या पुतनेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. होळी ही एका मुद्दाम खणलेल्या खड्ड्यात गवत, लाकूड, गोवर्‍या पेटवून केली जाते. पुतनेला स्वतः कृष्णाने ठार मारले शिवाय होलाका, ढुंढा या राक्षसिणीचे दहन केल्याच्या पुराणात कथा आहेत. मदनाचे शिवाने दहन केल्याच्या कथेशीही होळीच्या उत्सवाचा संबंध जोडण्यात येतो. शिमगा या सणाच्या संदर्भात ढुंढा राक्षसिणीची कथा आलेली आहे. शिमगा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो.

1) देवाची रूपे लावल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते.

2) काही गावांमध्ये होळी झाल्यानंतर पालखी गावोगावी फिरते.

3) यावेळी ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये स्थापन केले जातात.

4) पालखीला छान आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते.

ज्या दिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी अंगणामध्ये सडा, सारवण घालून ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी केली जाते. सुवासिनी ग्रामदेवतेची ओटी भरतात. कुटुंबाच्या सुख-समाधानासाठी गार्‍हाणी घातली जातात. या दिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात. विशेष म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.

गावाकडून पोराबाळांसह आलेल्या चाकरमान्यांचे होणारे स्वागत, घरच्या अंगणात खळ्यात केली जाणारी शिमग्याची तयारी, त्याचप्रमाणे होळी पेटवल्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणे, जळती लाकडे फेकण्याचा खेळ असे अनेक प्रकार या ‘शिमगा उत्सवात’ पाहायला मिळतात. ढोल-ताशाच्या गजरात नाचत गात पालखी गावात देवळाच्या समोर परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते आणि सुरू होतो शिमगा. पौर्णिमेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस असे चालूच असते. पौर्णिमेला मुख्य होळी जाळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव, शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातली देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो. त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळ, नमन हा लोकनृत्य प्रकार असतो. काही ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धाही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखीचे घरोघरी दर्शन दिले जाते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे तर काही ठिकाणी देवीच्या दिवट्या, गोंधळ घालून होतो. पंचमी या विधीनाट्य लोककलेने आपला स्वतंत्र ठसा उमटवल्याचे निदर्शनास येते. या विधीनाट्यात देवतेची सोंगे, देवतेचे मुखवटे पूजनीय असतात. पंचमी प्रयोगात्मक लोककलेचे स्वरूप दुपेडी असते. अशा पद्धतीने मुलांनो, शिमगोत्सव एक लोककला आहे असे सहज म्हणता येईल. मुले या शिमगोत्सवात दंग होऊन पुढील लोकक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या