Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPhaltan Doctor Death Case : मयत डॉक्टर तरुणीचा शवविच्छेदन अहवाल आला समोर;...

Phaltan Doctor Death Case : मयत डॉक्टर तरुणीचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

सातारा | Satara

जिल्ह्यातील (Satara District) फलटण (Phaltan) येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून भाड्याच्या राहत्या खोलीत गुरुवार (दि.२३ ऑक्टोबर) रोजी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. या आत्महत्या प्रकरणामुळे (Phaltan Doctor Crime New) राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

डॉक्टर संपदा मुंडेंनी (Dr.Sampda Munde) आत्महत्या (Suicide) करण्याआधी हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने, पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला.यातील बदने याने चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकरने शारिरीक आणि मानसिक छळ केला, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. यानंतर आता आत्महत्या करणाऱ्या तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अहवालात डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंडे यांच्या शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मृत डॉक्टर मुंडेंचे सीडीआर देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.यामध्ये प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने (Gopal Badane) यांच्यासोबत मृत डॉक्टर संपदा मुंडे यांचा कॉल झाल्याचे तपासात उघड झाले.

तसेच गोपाल बदने यांचे मयत डॉक्टर तरुणीशी मैत्री शिवाय दुसरे कोणतेही संबध नसल्याचे पोलीस तपासात सांगत असल्याचे बोलले जात आहे. तर मृत्यूच्या आधी देखील गोपाल बदनेसोबत मुंडेंचे फोनवर (Phone Call) बोलणे झाल्याचे तपासात समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...