नाशिक : नाशिक सायकलीस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन नाशिक पेलेटॉन 2020 या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धा शनिवार (दि. 15) जिगरबाज सायकलिस्टसने दाखवलेल्या उत्साहामुळे यशस्वीवणे पार पडला. रविवारी (दि. 16) सकाळी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात स्मार्ट सिटी की स्मार्ट सवारी अंतर्गत ग्रीन राईड (10 किमी), किड्स राईड (5 किमी), नॅबची दिव्यांगांसाठीची 5 किमी राईड यांसह स्पर्धात्मक 15 किमीची स्प्रिंट पेलेटॉन आणि 50 किमीची मिनी पेलेटॉन स्पर्धा एकूण आठ गटांत घेण्यात येणार आहेत.
80 किमीची पेलेतटॉन स्पर्धा 18 ते 40 वयोगट (पुरुष), 18 ते 40 वयोगट (महिला), 40 वर्षांपुढील वयोगट (पुरुष), 40 वर्षांपुढील वयोगट (महिला) अशा चार गटांत झाली. या दोन दिवसीय स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (दि. 16) होणार आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर केवल टेंभरे, नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव नितीन नागरे, रॅमवीर डॉ. हितेंद्र महाजन, विद्यार्थी प्रतिनिधी चिरायू पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी नाशिक सायक्लिस्टसचे अध्यक्ष रत्नाकर आहेर, पेलेटॉन रेस डायरेक्टर मितेन ठक्कर तसेच नाशिक सायक्लिस्टस फाऊंडेशनचे सदस्य सरचिटणीस नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, खजिनदार योगेश शिंदे, शैलेश राजहंस, ऍड वैभव शेटे, विशाल उगले, नीता नारंग, डॉ. मनीषा रौदळ, सोफिया कपाडिया, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रभरातून आलेल्या 70 हुन अधिक स्पर्धकांनी पोषक वाटल्याचे सांगत 80 किमीची रेस पूर्ण केली. स्प्रिंट आणि मिनी पेलेटॉन स्पर्धेत नाशिकमधील नामांकित विद्यालयातील विद्यार्थी तसेच देशभरातून सायकलपटू सहभागी होणार आहेत. पेलेटॉन स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून रविवारी (6 जानेवारी) होत असलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रसिद्ध सिने अभिनेत्री शर्मीष्ठा राऊत, आयपीएस अधिकारी हरीश बैजल, स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल, मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आदी राहणार उपस्थित राहणार आहेत.
15 किमी स्प्रिंट पेलेटॉन आणि 50 किमी मिनी पेलेटॉनसह 80 किमीच्या पेलेटॉन विजेत्या सायकलपटूंना रविवारी (दि. 16) सकाळी 11 वाजता बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या सन्मानपत्र चषक आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. सायकलपटूसाठी भरघोस बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत नाशिक सायकलीस्टतर्फे नाशिकमध्ये सायकल चळवळ वाढविण्यासाठी नाशिक रँडोनर्स मायलर्स अर्थात एनआरएम या उपक्रमाची 3 वर्ष पूर्ण झाली असताना नाशिक पेलेटॉन सारख्या स्पर्धा होत असल्याची माहिती नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष रत्नाकर आहेर यांनी दिली आहे.