Sunday, September 15, 2024
HomeनगरPhoto : अकोलेत पाणी हक्क संघर्ष समितीचा मोर्चा

Photo : अकोलेत पाणी हक्क संघर्ष समितीचा मोर्चा

अकोले | प्रतिनिधी

- Advertisement -

उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील (Pravara River) जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे, उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची (canals) अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावे,…

विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी, मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करावे, भंडारदरा (Bhandardara) व निळवंडे (Nilwande) जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्या या मागण्यांसाठी आज दुपारी शुक्रवारी पाणी हक्क समितीच्या (Water Rights Struggle Committee) वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. किरण लहामटे (MLA Dr Kiran Lahamte) हेही सभास्थळी उपस्थित आहेत. हा मोर्चा अकोले (Akole) येथील महात्मा फुले चौकातून (Mahatma Fule Chauk) घोषणा देत बाजार तळावर नेण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या आहेत.

मोर्चेकऱ्यांनी ट्रॅकटरसह या मोर्चात सहभाग नोंदविला. लाभ क्षेत्रातील बाजारतळ येथे कार्यकर्त्यांची भाषणे सुरू आहेत.प्रश्न मार्गी न लागल्यास यापेक्षा अधिक व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या