Saturday, May 4, 2024
Homeजळगावलग्नाची ऑर्डर करुन परतणार्‍या छायाचित्रकाराचा अपघातात मृत्यू

लग्नाची ऑर्डर करुन परतणार्‍या छायाचित्रकाराचा अपघातात मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

लग्नाची ऑर्डर घेतली असल्याने लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो (Wedding event photos) काढण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकारांच्या (Photographer) वाहनाचा शनिवारी पहाटे नाशिक-मालेगाव रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातात धनराज उर्फ विक्की प्रकाश चव्हाण (वय-32, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले.

- Advertisement -

शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा छायाचित्रकार (Photographer) असून त्यांचे क्षण फोटो स्टुडिओचे नावाने दुकान आहे. त्यांना नाशिक येथील लग्नाची ऑर्डर ( Wedding order) असल्याने ते आपल्या लहान भावासह काही सहकार्‍यांसोबत आपल्या चारचाकीने नाशिकला गेले होते.

ऑर्डर झाल्यानंतर काम आटोपून ते शुक्रवारी सायंकाळी जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. याचवेळी नाशिक (Nashik) ते मालेगाव (Malegaon) दरम्यान त्यांचा कारचा तिहेरी अपघात झाला. अपघात इतका विचित्र होता की, या अपघातात धनराज चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात निलेश यांच्यासह विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

अपघातात वाहनांचा चुराडा

अपघात इतका विचित्र होताच की ट्रक, टेम्पो व चारचाकीच्या पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. दरम्यान, आज दुपारी मयत धनराज याचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या