Sunday, May 19, 2024
HomeजळगावPhotos # दूध संघासाठी अडीच लाखापर्यंत पोहोचला फुलीचा भाव

Photos # दूध संघासाठी अडीच लाखापर्यंत पोहोचला फुलीचा भाव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) 19 जागांसाठी (19 seats) शनिवारी 100 टक्के मतदान (100 percent voting) झाले. जिल्ह्यातील सर्व सातही केंद्रांवर दूध संघाच्या मतदानासाठी मतदारांचा उत्साह (voter turnout) दिसून आला. यंदाची निवडणूक (election) ही भाजपा (B J P) आणि राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे (Nationalist leader MLA. Eknathrao Khadse) यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 39 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. आता या निवडणुकीचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. दूध संघाच्या या निवडणुकीत भाजपा- शिंदे गट प्रणित शेतकरी विकास तर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल अशी सरळ लढत होती. शनिवारी जिल्हा दूध संघाच्या 19 जागांसाठी आज जिल्ह्यातील सात केंद्रांवर मतदान पार पडले. सकाळी 8 वा. मतदानाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर बहुतांश मतदार हे मतदानासाठी केंद्रांवर निवांत पोहोचत होते.

दुपारी वाढला मतदानाचा टक्का

दूध संघासाठी सकाळी 8 वा. मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 8 ते 10 यावेळेत अत्यंत संथ गतीने मतदान झाले. तर स. 10 ते दुपारी 12 या वेळेत मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसून आले. सकाळी 8 ते 10 यावेळेत सातही केंद्रांवर 80 तर स. 10 ते दुपारी 12 यावेळेत 266 मतदान झाले. तर दुपारी 4 वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

दोन्ही मंत्र्यांसह मंदाकिनी खडसेंचे जळगाव केंद्रांवर मतदान

जळगाव शहरातील सत्यवल्लभ सभागृह येथे जळगाव आणि जामनेर तालुक्यातील 57 मतदारांचे मतदान होते. याठिकाणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनीही जळगाव केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. तसेच राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी तथा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, छाया गुलाबराव देवकर, मालतीबाई महाजन, महापौर जयश्री महाजन यांनीही मतदान केले.

आज दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल येणार

जिल्हा दूध संघाच्या झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या दि. 11 रोजी सकाळी 8 वा. सत्यवल्लभ सभागृह येथे होणार आहे. मतमोजणीसाठी सात टेबल असून 22 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक प्रतिष्ठेची

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिंदे गटाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: जळगाव तालुका मतदारसंघातून उमेदवारी केली. तर भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनीही जामनेर तालुका मतदारसंघातून उमेदवारी करीत मैदानात उतरले होते. मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली.

Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळVISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

वयोवृध्द मतदाराला आणले खुर्चीत बसवून

जिल्हा दूध संघासाठी एक-एक मतदार हा उमेदवारांसाठी लाखमोलाचा होता. त्यामुळे मतदारांना केंद्रस्थळी पोहोचविण्यासाठी शेतकरी विकास आणि सहकार पॅनलकडून व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. नांद्रा येथील वयोवृध्द असलेल्या सुशीलाबाई गोविंदराव पाटील यांना केंद्रस्थळी रिक्षाने आल्यानंतर खुर्चीत बसवुन मतपेटीपर्यंत पोहोचविण्यात आले होते.

Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दूध संघाच्या यंदाच्या निवडणुकीत खोक्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. मतदारांनी मतदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असला तरी लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. या निवडणुकीत धनशक्ती मोठी होती. तरी विकासाच्या बाजूने मतदार राहिल्याचे चित्र दिसून आले आहे.

एकनाथराव खडसे,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

दूध, तुप, लोण्यात खाल्लेला पैसा या निवडणुकीत दिसला. मात्र मतदार हा अत्यंत सूज्ञ आहे. दूध संघाच्या निवडणुकीत 100 टक्के मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचाच विजय होणार आहे.

मंगेश चव्हाण,आमदार, भाजपा

मतदारांची चांदी

दूध संघाच्या निवडणुकीत यंदा मतदारांची चांगलीच चांदी झाली. मतदानाच्या एक दिवस आधी एक ते दीड लाख रूपये फुलीचा भाव होता. तो दुसर्‍या म्हणजेच मतदानाच्या दिवशी अडीच लाखापर्यंत पोहोचल्याची चर्चा होती. काही उमेदवारांनी मतदारांना वैयक्तीक 50 हजार ते 1 लाख रूपयांचे पाकीटही दिल्याची चर्चा होती. गेल्या वेळी सर्वपक्षीय पॅनलमुळे मतदारांना फारसा लाभ झाला नाही. यंदा मात्र परस्पर विरोधी पॅनल राहिल्यामुळे मतदारांना लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या