धुळे – Dhule
मुंबई-आग्रा महामार्गावरील गव्हाणे फाटा नजीक आज सकाळी मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. सुमारे 30 ते 40 जखमी मजुरांना नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात दोन ते तीन मजूर जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी जखमी रुग्ण व नातेवाइकांचा एकच आक्रोश केला. यावेळी ग्रामस्थ मदतीला धावून आले होते
सेंधवा मध्यप्रदेश येथून शेतात मजूरी कामासाठी आलेल्या मजूरांच्या वाहनाचा आज 9 वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा राष्ट्रीय मुंबई-आग्रा महामार्गावरील गव्हाणे फाट्यानजीक भीषण अपघात झाला. भिषण अपघात झाला. टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. अपघातातील जखमी सुमारे 30 ते 40 मजुरांना नरडाणा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर रुग्णांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे योगेश राजगुरू यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. नरडाणा येथील ग्रामस्थ देखील मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळतात शिरपूर तालुक्याचे आमदार
काशिराम पावरा यांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली.