पिंपळनेर -Dhule – Pipalner – वार्ताहर :
पिंपळनेर- नवापूर रस्त्यावर गोमांस घेऊन जाणारी व्हॅन पिंपळनेर पोलिसांनी पकडली. 80 किलो वजनाचे जनावरांचे मांस अंदाजे किंमत 11 हजार 200 व गाडी 50 हजार रुपयांची असा एकूण 61 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एकाला अटक करण्यात आली आहे.
पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना नवापूर कडून पिंपळनेरकडे येणार्या मारुती ओमनी गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व पोलीस नाईक निलेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी नवापूर रस्त्याला सापळा लावला. त्यावेळी कुडाशी गावाजवळ नवापूर कडून येणारी फिक्कट गुलाबी रंगाची मारुती ओमनी गाडीला पोलिसांनी थांबविली व गाडीची तपासणी केली. त्यावेळी गोण्यांमध्ये प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये जनावराचे मांस आढळून आले.
घटनेचा पंचनामा करून मारुती ओमनी जीजे 05 ए जी 955 ही क्रमांकाची गाडी ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणली. सदर गाडीचा चालक जुबेर रहमान कुरेशी रा. इस्लामपुरा नवापूर यास ताब्यात घेतले.
80 किलो वजनाचे जनावरांचे मांस अंदाजे किंमत 11 हजार 200 व गाडी 50 हजार रुपयांची असा एकूण 61 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मांसची तपासणी करून दोन वेगवेगळ्या बॉटलमध्ये नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जुबेर कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.