Friday, May 3, 2024
Homeधुळेआ. मंजुळा गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह मेसेज

आ. मंजुळा गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह मेसेज

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

साक्री तालुका विधानसभा मतदार संघाच्या महिला आ. मंजुळा गावित यांच्याविरुद्ध व्हॉट्सअ‍ॅप पांझरा कान बचाव समिती नावाच्या ग्रुपवर

- Advertisement -

जगदीश अकलाडे या व्यक्तीने आक्षेपार्ह अश्लील मेसेज टाकल्यामुळे त्याच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर पांझरा कान बचाव समिती या ग्रुपचे अ‍ॅडमिन सनी अकलाडे यांनी मोबाईल क्रमांक 7020842465 धारकास रिमूव्ह केले.

यानंतर फिर्यादी माधव नांद्रे यांनी वरील मोबाईल क्रमांक धारकाच्या बाबतीत माहिती घेतली असता त्या व्यक्तीचे नाव जगदीश अकलाडे रा. साक्री, मुळगाव दिघावे असे असून हा मोबाईल क्रमांक ही व्यक्ती वापरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात माधव नांद्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरु जगदीश अकलाडे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या