पिंपळनेर – Pimpalner – Dhule – वार्ताहर :
शहरातील प्रतिष्ठित कांदा व्यापारी व त्यांचा मुलगा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे बाजार समितीने दि. 4 ऑगस्टपर्यंत कांदा मार्केट बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.
शहरात कोरोना संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ नये यासाठी अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी पुढील 14 दिवसांसाठी पिंपळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर एका खासगी बँकेतील काही कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
शहरात कोरोना संसर्गजन्य रुग्णांमध्ये वाढ होत असून रविवारी 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात शहरातील प्रतिष्ठित कांदा व्यापारी व त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. बाजार समितीने दि. 4 पर्यंत कांदा लिलाव मार्केट बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.
शहरातील बसस्थानक लगत असलेल्या मेडिकल दुकानातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुढील आदेश येईपर्यंत मेडिकल दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. दुकानदार मालक व इतर कर्मचारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.