Saturday, May 4, 2024
Homeनगरपिंपरी निर्मळ येथे शॉर्ट सर्कीटने पावणेदोन एकर ऊस जळाला

पिंपरी निर्मळ येथे शॉर्ट सर्कीटने पावणेदोन एकर ऊस जळाला

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे महावितरण कंपनीच्या वीज वाहक तारांच्या शॉर्ट सर्कीटमुळे पावणेदोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकर्‍याचे पावणेदोन लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे.

- Advertisement -

पिंपरी निर्मळ येथील विजय लक्ष्मण निर्मळ यांच्या आडगाव रोड जवळील गट नंबर 612 मधील तोडणीस आलेला 72 गुंठे ऊस शॉर्ट सर्कीटने जळाला आहे. उसातून आडव्या जाणार्‍या महावितरणच्या वीज वाहक तारा ढिल्या झाल्यामुळे वार्‍याने एकमेकांना चिकटून शॉर्टसर्कीट झाले. त्यात त्यांचा पावणेदोन एकर ऊस जळून जवळपास पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. दुग्ध व्यवसाय असल्याने गायीच्या चार्‍यासाठी हा ऊस ठेवला होता.

मात्र ऊस जळाल्यामुळे पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या बाभळेश्वर येथील अधिकार्‍यांना लाईन दुरुस्तीसाठी वारंवार लेखी पत्र देवूनही कार्यवाही न झाल्याने हा अपघात होऊन नुकसान झाल्याचे विजय निर्मळ यांनी सांगितले. तसेच महावितरणच्या चुकीने अपघात घडल्यामुळे वितरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या