Monday, June 24, 2024
Homeनगरनगर-मनमाड महामार्गावर खासगी बसला भीषण आग!

नगर-मनमाड महामार्गावर खासगी बसला भीषण आग!

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

- Advertisement -

राहाता (Rahata) तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील बंद असलेल्या टोलनाक्याजवळील हॉटेल साई आदर्शच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेली खाजगी ट्रॅव्हल बसला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) शिवारातील टोलनाक्याजवळ असलेल्या हॉटेल साई आदर्शच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एन एल 01 बी 2093 या नंबरच्या ट्रॅव्हल बसला अचानक भिषण आग (Traveler Bus Fire) लागली. यात बस जळून खाक झाली.प्रवरा कारखाना राहाता नगरपालिका व शिर्डी (Shirdi) नगरपालिका यांच्या अग्निशामक बंबांनी ही आग आटोक्यात आणली. यातील सर्व प्रवासी जेवणासाठी हॉटेलवर थांबलेले असल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र काहीचे सामान यात जळुन गेले आहे. प्रचंड उष्णता असल्याने व वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ही बस पुण्याहुन (Pune) राजस्थानला जात होती. लग्नाची तीथ दाट असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. आग लागल्याने नगर-मनमाडवरील प्रवासी मोठ्या संख्येने थांबून होते. लोणी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सहकार्‍यांमार्फत घटनेवर नियंत्रण मिळवले. आग वेळीच अटोक्यात आल्याने प्रवांशासह प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या