Saturday, May 4, 2024
Homeनगरहनुमान मंदिरातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास

हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून लाखोंचा ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) हद्दीमध्ये चोरट्यांचा (Thieves) धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या, घरफोडी (Burglary), वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटना घडत आहे. तोफखाना पोलीस (Topkhana Police) या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहेत. रविवारी रात्री चोरट्यांनी पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) तागड वस्ती येथे असलेल्या पुरातन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर (Donation box of Hanuman Temple) डल्ला मारला आहे. गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटीमधील लाखो रूपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.

- Advertisement -

मंदिरातील पुजारी रवींद्र वामन पाटील यांनी सांगितले की, हे पुरातन मंदिर आहे. पाच वर्षानंतर ही दानपेटी उघडली जाते. या दानपेटीच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करायचे होते. परंतु चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेले असल्याचे त्यांनी सांगितले. चोरीची घटना झाल्यानंतर पुजारी रविंद्र वामन पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलीस प्रशासनाचा आरोपींवर वचक राहिला नाही असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होऊ लागला आहे ? तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी, घरफोडी अशा अनेक घटना वारंवार घडत आहे या सर्व घटनांवर पोलीस प्रशासन नियंत्रण मिळणार का असा प्रश्न सावेडी उपनगर भागातील नागरिक उपस्थित करू लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या