Wednesday, November 13, 2024
Homeनाशिकपरवानाधारकांची पिस्तुल पाेलीस ठाण्यात जमा

परवानाधारकांची पिस्तुल पाेलीस ठाण्यात जमा

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आचारसंहितेमुळे अग्निशस्त्र परवानाधारकांकडून बंदुका, पिस्तुले ताब्यात घेण्याची कार्यवाही शहर व ग्रामीण पोलिसांनी पूर्ण केली आहे. शहरात ३९३ तर ग्रामीण पोलिसांनी ७२९ बंदुका पाेलीस ठाण्यांत जमा करवून घेतल्या आहेत. या पिस्तुलांसह काडतुसेदेखील जमा आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही पिस्तुले पुन्हा परवानाधारकांना दिली जाणार आहेत. तसेच नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतून सुमारे चार हजारांपेक्षा जास्त बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पाेलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये, शस्त्र व परवाना विभागामार्फत सर्व पोलिस ठाण्यांतील गोपनीय विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच नाशिकमधील शस्त्र परवानाधारकांना पिस्तूल व काडतुसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार शहरात एक हजार ३९७ परवानाधारकांपैकी ३९३ जणांनी शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. उर्वरित परवानाधारक माजी सैनिक, सुरक्षारक्षक, शासकीय अधिकारी आहेत. तर जिल्ह्यातील नऊशेपैकी ७२९ जणांनी पोलिसांकडे पिस्तुल जमा केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या