Saturday, July 27, 2024
Homeधुळेदेवपूरात खड्ड्यांमुळे वाढला धोका

देवपूरात खड्ड्यांमुळे वाढला धोका

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे शहरातील देवपूर भागात भुयारी गटारींचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. आजच्या जोरदार पावसामुळे या कामाच्या गुणवत्तेचे तिनतेरा वाजले.

- Advertisement -

इंदिरा गार्डन समोरील भरचौकात चेंबरच्या आजूबाजूचा रस्ताच खचून गेला. ठिकठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे धुळेकरांचा जीविताचा धोका वाढला आहे.

देवपूरात पाणी योजना आणि भुयारी गटारी या संदर्भातील कामे एकाचवेळी सुरु आहेत. यामुळे सर्वदूर रस्त्यांची पुर्णत: वाट लागली आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी झाल्यात, आंदोलने झालीत मात्र संबंधितांना लवकर काम करण्याच्या सूचना देण्यापलिकडे कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

परिणामी मान्सूनच्या पहिल्याच जोरदार हजेरीने या कामाच्या गुणवत्तेचे वाभाडेच काढले. मुळात ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे वाहने चालविणे अवघड झाले असता खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता आणखिच वाढली आहे.

त्यातल्या त्यात नित्कृष्ठ कामामुळे रस्ते खचून जात आहेत. तर रस्त्यांच्या मधोमध बांधण्यात आलेल्या चेंबरच्या आजूबाजूचा रस्ताही खचल्याने धोक्याचे गांभीर्य आणखीच वाढले आहे.

खापर फोडले मजिप्रावर

भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपा प्रशासनावर खापर फोडले आहे. यापुर्वी आपण अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करुन पावसाळ्यापुर्वीच खोदलेल्या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे सूचविले होते.

आज झालेल्या जोरदार पावसामुळे मेनहोल चेंबर आणि भुयारी गटारीची चारी ढासळून गेली. या कामाची मजिप्राचे शहर अभियंता श्री. कुलकर्णी, ठेकेदार हितेंद्र पटेल, नितीन शिंदे, रविंद्र पाटील, योगेश माने, सागर चौधरी यांनी पाहणी केली. पाऊस थांबल्यावर पुन्हा खडीकरण करण्यात येईल असे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या